श्रावण सुरु होतोय – श्रावणात हे पदार्थ खाणे टाळा

श्रावण महिना येत्या १२ तारखे पासून सुरू होत आहे. आपल्या महाराष्ट्रमध्ये अनेक लोक श्रावण महिना पाळतात. अनेक लोक कटिंग, दाढीसुद्धा करत नाहीत. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात अनेक पदार्थ वर्ज करण्यात आलेले आहेत. तसेच त्याचे वैज्ञानिक कारण देखील आहेत. श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी अनेक लोक आखाड म्हणजेच (गटारी) मोठ्या प्रमाणात साजरा करतात. गटारीच्या दिवशी मांसाहारावर ताव मारला जातो. या लेखामध्ये श्रावणात कुठले पदार्थ टाळावे हे आपण पाहू.

मांसाहार टाळावा: श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी अनेक लोक गटारी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. या वेळी चिकन, मटन वर ताव मारला जातो. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये चिकन, मटण आणि इतर मांसाहार वर्ज्य मानला जातो. हिंदू धर्मात तरी तसे संकेत आहेत. याला शास्त्रीय कारण देखील आहे, ते म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेक प्राण्यांवर जीव-जंतू कीटकनाशके आढळतात. त्यामुळे मांसाहाराचे सेवन केल्यास प्रकृती देखील बिघडू शकते. त्यामुळे श्रावण महिन्यात शक्यतो मांसाहार टाळावा.
वांगी: पावसाळ्यामध्ये वांगी ही अधिक प्रमाणात सेवन करू नये. याचे कारण म्हणजे वांग्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे वांग्याचे सेवन केल्यास खाज निर्माण होऊन ऍलर्जी होऊ शकते. तसेच प्रकृती बिघडू शकते.
लसुन / कांदा :

श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक लसूण, कांदा खाण्याचे टाळतात. कारण की हा भगवान शंकराचा महिना आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसून, कांद्याचे सेवन करत नाहीत. तसेच या दिवसांमध्ये कांदा, लसूण चांगल्या दर्जाचा मिळत नाही. त्यामुळे देखील लोक याचे सेवन करत नाहीत.
हिरव्या पालेभाज्या: श्रावण महिना तसेच पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या या पचण्यास जड असतात. त्यामुळे शक्यतो या दिवसांमध्ये पाले भाज्यांचे सेवन करू नये. पाले भाज्यांचे सेवन केल्यास पोट बिघडण्याची दाट शक्यता असते. शक्यतोपर्यंत पावसाळ्यात पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्यात.
दूध :

दूध जसे मानवी आरोग्याला अतिशय हितकारक आणि लाभदायक असे समजले जाते. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात तसेच श्रावण महिन्यात दुधाचे अधिक सेवन करू नये. याचे कारण म्हणजे पशूप्राण्यांना या दिवसांमध्ये आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुधातही याचा अर्क उतरू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज सकाळी चहा घेतो. शक्यतो श्रावण महिन्यामध्ये दूध अल्प प्रमाणात घेतले पाहिजे. जेणेकरून आपल्या प्रकृतीवर परिणाम होणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *