या लक्षणांनी ओळखा ब्लड कॅन्सर – माहिती Share करा

ब्लड कॅन्सर हा अतिशय जीव घेणा आजार मानला जातो. हा कॅन्सर कुठल्याही वयात होऊ शकतो. मात्र, वयाची चाळिशी पार केल्यानंतर याचा धोका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. स्मोकिंग, एड्समुळे या आजाराचा धोका उद्भवू शकतो. या लेखामध्ये आपण कॅन्सर नेमका कशामुळे होतो, हे जाणून घेऊयात आणि ब्लड कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी काही उपायही जाणून घेऊ.
ब्लड कॅन्सर चे संकेत:


१. लहानशा जखमेवर जास्त रक्त वाहणे
२. दीर्घकाळ सांधेदुखी राहणे
३. त्वचेवर सतत खाज येणे
४. वजन कमी होणे
५. श्वास घेण्यास त्रास होणे
ब्लड कॅन्सरचे प्रकार
१. क्रोनिक मायलोजिनस : या कॅन्सरच्या प्रकारात सुरुवातीच्या स्टेजमध्ये शरीरावर कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसत नाहीत. मात्र, हळूहळू शरीरामध्ये पसरत जातो. हा कॅन्सर शरीरामध्ये अॅक्यूट मायलोजिनस ल्युकेमियाच्या तुलनेत हळूहळू पसरतो.
२. अॅक्यूट मायलोजिनस: हा कॅन्सर शरीरामध्ये जलद रित्या पसरतो. हे शरीरामध्ये मायलोजिनस नामक पेशींना धोका पोहोचते. नंतर शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते.
३. क्रोनिक लिंफोसायटिक: हा कॅन्सर अॅक्यूट लिंफोसायटिक ल्युकेमिया कॅन्सरच्या तुलनेत शरीरात हळळू पसरतो. यामुळे दीर्घकाळानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
ब्लड कॅन्सर पासून दूर राहण्याचे उपाय


१. आहारात फळभाज्यांचा समावेश करावा: ब्लड कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये विटामिन आणि मिनरलयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. रोज 30 मिनिटे व्यायाम करा. मसाल्याचे पदार्थ रोजच्या जेवणातून टाळा.
२. केमिकल, परफ्यूम टाळावेत: शुभ्र केमिकल आणि परफ्यूम टाळावेत. कीटकनाशकपासून दूर रहावे.
३. रेडिएशन टाळावे: रेडिएशन हे रक्तापर्यंत सहज जाते. त्यामुळे ब्लडप्रेशरची शक्यता वाढते. त्यामुळे रेडिएशन नियमितपणे टाळावे.
४. धुम्रपान टाळा: धूम्रपानामुळे शरीरात टॉक्सिन तयार होते. हे टॉक्सिन कॅन्सरच्या पेशी तयार करतात. यामुळे धूम्रपान टाळावे आणि आपले आरोग्य जपावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *