Touching fingers of real and digital businessmen on blurry blue city background. Close up. Future concept

अहो आश्चर्यम, तेरा वर्षाचा भारतीय मुलगा बनला सॉफ्टवेअर कंपनीचा मालक

दुबई/ भारतीय लोक हे अतिशय बुद्धिमान आहेत, हे तर सगळ्या जगाने मान्य केले आहे. मात्र, भारतातील अनेक मुले हे अतिशय अफाट बुद्धीची असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच एक घटना घडली आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. दुबईतील आदित्य राजेश हा 13 वर्षीय भारतीय मुलगा एका सॉफ्टवेअर कंपनीचा मालक झाला आहे. त्याने चार वर्षांपूर्वी स्वतःचे पहिले मोबाईल ॲप विकसित केली होते. तो मूळचा केरळ येथील रहिवासी आहे. येथील एका वृत्तपत्राने बातमी दिलेली आहे. आदित्य नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याने कंटाळवाणेपणा वर मात करण्यासाठी पहिले मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले. त्यानंतर ते ॲप्लिकेशन ग्राहकांसाठी लोगो आणि संकेतस्थळही विकसित करत आहे. आदित्यनाथने वयाच्या पाचव्या वर्षीच संगणक वापरण्यास सुरुवात केली होती. तेराव्या वर्षी त्याने ‘त्रिनेत्र’ सोलुशन ही कंपनी सुरू केली. त्रिनेत्रमध्ये तीन कर्मचारी असून शालेय सहकारी व त्याचे मित्रच आहेत. याबाबत सांगताना आदित्य म्हणाला की, माझा जन्म हा केरळच्या ठीरुविला येथे झाला आहे. त्यामुळे भारत देशाविषयी मला अफाट प्रेम आहे. मी पाच वर्षाचा असताना माझे बाबा दुबईत आले. ते एका मोठ्या कंपनीत कामाला आहेत. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा बीबीसी टायपिंग हे मुलांसाठीचे संकेतस्थळ दाखवले होते. त्यानंतर माझी संकेतस्थळाची आवड वाढीस लागली. या संकेतस्थळावर विद्यार्थी टायपिंग शिकू शकतात. खरे तर अठराव्या वर्षी मला कंपनीचा मालक व्हायचे आहे. तरीदेखील सध्या मी एका कंपनीचा मालक झालो आहे आणि आम्ही सगळेजण अतिशय सहकार्याने काम करत आहोत. भविष्यात देखील कंपनी मोठी करायचे आपले स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *