ब्राह्मण समाजाला आरक्षण देणे शक्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई/ राज्य सरकारने मराठा समाजाला नुककेच 16 टक्के आरक्षण देण्याचे घोषित केले आणि अनेक समाजांनी देखील आम्हाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाने देखील आर्थिक निकषावर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ब्राह्मण समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ब्राह्मण समाजाचा अंतसंतोष देखील उफाळून वर येऊ शकतो. शनिवारी एका खाजगी दूरचित्रवाणी ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षण असो किंवा अन्य कोणताही प्रश्न असो जनतेच्या सर्व प्रश्नांना आम्ही सामोरे जाऊ. मी कोणत्याही प्रश्न पासून पळ काढणारा मुख्यमंत्री नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. आता धनगर आरक्षण बाबतही केंद्र सरकारकडे योग्यच शिफारस करू, असेही ते म्हणाले. शिक्षण महागडे होत असल्याने ब्राह्मण समाजातील तरुणांना उच्च शिक्षण घेणे शक्‍य होत नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे मान्य आहे. मात्र, ब्राह्मण समाजाला आपण आरक्षण सध्या देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यभरात तब्बल 56 मोर्चे निघाल्यानंतर मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले आहे. आता हे आरक्षण कोर्टात टिकविण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. काहीजण या आरक्षणाविरोधात कोर्टात गेले आहे. सदावर्ते यांनी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जालन्याच्या एका तरुणाने गुणवंत सदावर्ते यांना कोर्टाच्या आवारातच मारहाण केली होती. त्यानंतर आरक्षणा मध्ये कोणी आल्यास त्याला चांगला धडा शिकवू, असे मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वीच म्हटले आहे. आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने 72 हजार जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. त्यानुसार जाहिरात देखील येणे सुरू झाले असतानाच हायकोर्टाने याबाबत सरकारला फटकारले. आरक्षणाचा विषय कोर्टात असताना तुम्ही जागा भरण्याची घाई कशाला करता,? असेही म्हटले आहे. त्यावर सरकारने हे आरक्षण टिकणारच, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणामुळे राज्यभरातील मराठा समाज सुखावला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *