अबब ईशा अंबानीच्या लग्नात खर्च झाले ८०० कोटी

अंबानी कन्या ‘ईशा’ च्या लग्नाआधीचे जे सगळे विधी असतात ते उदयपूरला करण्यात आले. उदयपूर मध्ये अंबानींनी सगळी फाईव्ह स्टार हॉटेल्स पूर्ण बुक केली होती येणाऱ्या पाहुण्यांसाठी ज्यांचा पर नाईट खर्च साधारण अठ्ठावन हजार असतो. आणि सारबाराईत कुठे कमी नाही हो चक्क हजारो लक्झरी कार्स होत्या त्या पाहुण्यांच्या दिमतीला..!

बरं मोठं लग्न म्हणजे पाहुणे पण मोठेच की. भारताचे एकंएक श्रीमंत अंबानींच्या लग्नाचे पाहुणे.. ते कमी होते की काय म्हणून “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन” हे देखील आवर्जून लग्नाला आले होते. ह्या सगळ्या पाहुण्यांना नेण्या आणण्यासाठी काय सोय असेल म्हणता?? अहो अंदाजे ४० चार्टर्ड विमानं..!!

उदयपूरच्या उदय विलास ह्या पंच तारांकित हॉटेलमध्ये भन्नाट पाहुण्यांसाठी भन्नाट करमणूक तर पाहिजेच मग काय अमेरिकेतल्या प्रसिद्ध पॉप सिंगर बेयोन्स चा लाईव्ह परफॉर्मन्स ठेवला की. ती म्हणे भारतासारख्या गरीब देशात तिचे कार्यक्रम का काय करत नसते.. म्हणूनच तिला बोलावून अंबानींनी तिचा कार्यक्रम ठेवला. तिची किरकोळ १५ कोटींची बिदागी देऊन तिला नारळही दिला..

एवढं सगळं असताना मात्र अंबानी माणुसकीला जागले.. ७डिसेंबर ते १०डिसेंबर असे सतत चार दिवस अंबानी कुटुंबीयांनी ५१०० लोकांना अन्न दान केले. सतत चार दिवस दिवसातून तीन वेळा लोकांना जेवण आणि ते स्वतः अंबानी कुटुंबीयांनी लोकांना आपल्या हातांनी वाढून, आदरपूर्वक आग्रह करून..! अन्नदान करून ‘नारायण सेवा संस्थान’ च्या लोकांना तृप्त करून लेकीसाठी आशीर्वाद घेतले हो..

एवढा सगळा पैशांचा जाळ अन धूर संगटच काढून लग्नाला मात्र घरच्या मांडवात आले.. आपल्या “अँटिलिया” मध्ये. हिचे २७ मजले सुद्धा नव्या नवरी प्रमाणे सजले होतेच. घरात ईशाचा विवाह सोहळा १२ डिसेंबर रोजी पार पाडून कन्येची पाठवणी पिरॅमलांकडे केली. लग्ननंतर जंगी रिसेप्शन शिवाय कार्य थोडीच संपत?? ते त्यांच्या ‘जिओ हाऊस’ मध्ये पार पडेल..

आता विचार करा की ह्या ४-५ दिवसांचा आणि भव्य लग्न सोहळ्याचा खर्च किती असेल..? फक्त लग्नाचा खर्च ११० कोटी असा अंदाज आहे. बाकी इतर खर्च वेगळाच असेल. आणि इतर सगळं मिळून खर्च ७०० – ८०० घरात.. डायरेक्ट प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायनाच्या लग्नाशी बरोबरी..!! कसंय ना लग्न आहे अंबानींच्या घरचं.. मग काय होऊद्या की खर्च….!!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *