सर्दी झाल्यास करा घरच्या घरी उपाय

सध्या थंडीचे दिवस आहेत. तसेच वातावरणात अनेकदा बदलही होत आहे. कधी दिवसा ऊन तर मध्येच पाऊस आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे, त्यांना वारंवार सर्दी जात होते. हे प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाऊनच गोळ्या घेऊन उपचार करणे परवडत नाही. यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे घरच्या घरी उपाय करून सर्दीला दूर ठेवू शकता. या लेखामध्ये आपण कुठले उपाय करायचे ते पाहूया.
हळद, अद्रकाची पावडर: अद्कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक गुण असतात. जे आजार बरा करतात. अर्धा चमचा काळी मिरी, एक चमचा हळद आणि तेवढ्याच प्रमाणात अद्रकाची पावडर एका कपामध्ये घेऊन त्यात पाणी टाकून साखर घालून गरम करा. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे राहील, त्या वेळी थंड करून घ्यावे. यामुळे सर्दीपासून तुमची सुटका होऊन तुम्हाला आराम भेटू शकतो.
धन्याचा चहा: आपण नियमितपणे चहा पीत असाल, पण सर्दी झाल्यावर आपण वेगळ्या प्रकारचा चहा प्यावा यावर धन्याचा चहा हा अधिक प्रभावी औषध म्हणून काम करतो. कच्चा धन्याचा चहा करून त्यांनी लवकरात लवकर आजार बरा होतो. यात तुळशीची पाने देखील आपण टाकून चहा करून घेऊ शकता. सर्दीला धन्याचा चहा हा अधिक प्रभावी औषध म्हणून काम करतो. कच्चा धन्याचा चहा करून त्यांनी लवकरात लवकर आजार बरा होतो. या तुळशीची पाने देखील आपण टाकून चहा करून पिऊ शकता.
तुळस : प्रत्येकाच्या अंगणात किंवा बालकनीत तुळस ही असतेच. तुळस ही अतिशय गुणकारी औषध आहे. तुळशीमध्ये रोगप्रतिकारक गुण असतात. ज्यामुळे शरीरातील घातक घटक संपतात. एक चमचा लवंगाची चूर्णाबरोबर दहा ते पंधरा तुळशीचे पाणी एक लिटर पाण्यामध्ये टाकून जोपर्यंत पाणी आधी होते तोपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी प्या. यामुळे तुमची सर्दी नाहीशी होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *