गंदा है पर धंदा है, नागपुरात कारमध्ये चालते सेक्स रॅकेट, पोलिसांकडून धरपकड सुरु

नागपूर/ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये चक्क कारमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अतिशय उच्चभ्रू वसाहतीत जिथे अतिशय वर्दळ कमी आहे, अशा ठिकाणी उभ्या कारमध्ये सर्रासपणे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये वीस वर्षाच्या कोवळ्या तरुणीचे शोषण करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.
गेले तीन ते चार महिन्यापासून नागपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छापे घालून सेक्स रॅकेट चे प्रकार उघडकीस आणले आहेत. नागपुरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये इमारती, हॉटेल, मोजेस आणि काही ब्युटी पार्लर मध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे आता कारमध्येच सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा पोलिसांच्या तपासणीत उघडकीस आली आहे. त्यामुळे सेक्स रॅकेट चालवण्याचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसापूर्वी नागपुरातील दीपक नगरात कारमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. पोलिसांनी माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यावर या कारवर छापा टाकला. अंधारात उभ्या करण्यात आलेल्या कारमध्ये मागील सीट काढून चक्क बेड तयार करण्यात आल्याचे आढळून आले कारच्या काचावर काळी फिल्म लावलेली होती. पोलिसांनी योगेश आणि राहुल या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही प्रकार सुरू असल्याचे अनेक सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.
20 वर्षीय तरुणीची सुटका: या दलालांसोबत तिथे आलेली 20 वर्षीय तरुणी महाविद्यालयाची विद्यार्थींनी असल्याचे स्पष्ट झाले. तिला दिशाभूल करून येथे आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, ही तरुणी पैशाची गरज असल्याने या व्यवसायात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. अतिशय कोवळ्या मुलींना या व्यवसायात आेढण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी वर्दळ नसलेल्या ठिकाणांवर संशयास्पद कारची तपासणी करण्याच्या सूचना पोलिस पथकांना दिले आहेत. सामान्य परिस्थितीत रात्रिच्या गस्ती पोलिसांकडून संशयास्पद वाहनाची तपासणी होतेच. मात्र, या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विशेष सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *