औरंगाबादच्या एमजीएम मुलींच्या वस्तीगृहात बीडच्या डॉक्टर तरूणीची हत्या

औरंगाबाद/ औरंगाबाद येथील एमजीएम कॅम्पस परिसरातील मुलींच्या वसतिगृहामध्ये डॉक्टर आकांक्षा देशमुख ( वय २२ रा. माजलगाव जिल्हा बीड) या तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या वस्तीग्रहामध्ये जवळपास चारशे मुली राहतात, तरीदेखील या घटनेबाबत कुणालाही काही माहिती मिळाली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचे बोलण्यात येत होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वस्तीग्रहात दररोज रात्री नऊ वाजता तेथील अधिक्षका सर्व मुलींची तपासणी घेतात, त्यावेळी आकांक्षा ही गैरहजर होती. त्यामुळे अधीक्षकांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिले असता ती पलंगाखाली बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. वस्तीगृह अधीक्षकांनी तिच्या भावाला याबाबत माहिती दिली. त्याने तात्काळ आकांक्षाला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह घाटीमध्ये दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालामध्ये गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस देखील खुनाचा दृष्टीने तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी देखील घाटी रुग्णालयात धाव घेऊन सगळ्या प्रकाराची माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी वस्तीगृहाची पाच तास पाहणी करून दोन दिवसाची सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दहा तासापासून अकांक्षा खोलीबाहेर निघाली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, वस्तीग्रहाच्या बाजूला एका इमारतीचे काम चालू आहे. या इमारती मधूनच वस्तीग्रहामध्ये आत उडी मारणे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करत आहेत. पोलिसांनी कामावरील कामगाराची चौकशी केल्याचे सांगितले. आकांक्षाच्या डावा खांदा, मांडीवर घाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फेसबुक काही दिवसापूर्वीच बंद: गेल्या पाच वर्षापासून आकांक्षा ही एमजीएम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिचा मुंबईला नंबर लागला होता. मात्र, तिने औरंगाबाद राहणे पसंत केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने फेसबुक अकाउंट बंद केल्याची देखील मित्रांमध्ये चर्चा होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *