चाइल्ड पोर्नोग्राफी गुगलवर सर्च केले तरी होईल शिक्षा

औरंगाबाद/ आजच्या तारखेमध्ये इंटरनेट शिवाय काहीही होऊ शकत नाही. सध्याचे युग हे मोबाईल वर आणि इंटरनेटवर आधारित आहे. आज ऑनलाईन सर्व काही वस्तू मिळतात. मात्र, असे असतानाही इंटरनेटचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युट्युब आणि इतर सोशल साईटवर पोर्नोग्राफी फिल्म पाण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. यातही चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे वेड अनेकांना असते. याची दखल घेऊन आता केंद्र सरकारने अनेक पोर्नोग्राफी फिल्म तसेच चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घातली आहे. याचाच एक भाग म्हणून आता गुगलवर तुम्ही चाईल्ड पोर्नोग्राफी असे सर्च जरी केले तरी तुम्हाला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. बाल लैंगिक अत्याचारात या सुधारणेबाबत औरंगाबादेत नुकतीच राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत हा सूर निघाला. या परिषदेत सायबर तंत्रज्ञान या विषयावर अनेकांनी मार्गदर्शन केले.जर कुणी इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्राफी असा शोध घेत असेल आणि ही बाब पोलिसांच्या नजरेस पडल्यास किंवा यावर कोणी तक्रार केल्यास सुधारणा कायद्यानुसार सर्च करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे कैद आणि दहा लाख रुपये दंड आणि दुसर्यांदा पकडल्यास सात वर्षे आणि दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे.महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेपॉर्न साईट पाण्याचे अनेकांना वेड असते. हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यापासून महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. पूर्वी अशा काही साईट नव्हत्या. त्यामुळे अत्याचाराचे प्रमाण एवढे नव्हते. पण साइटमुळे अनेकांच्या मनावर सखोल परिणाम होतो. उत्तेजित होतात आणि त्याची परिणिती लैंगिक अत्याचार होते. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे, असेही या वेळी या परिसंवादात सांगण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *