संभाजी महाराजांबद्दल शालेय शिक्षण विभागाच्या पुस्तकात चुकीचा उल्लेख

पुणे/ राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने वाटप करण्यात येत असलेल्या एका पुस्तकात समर्थ रामदास स्वामी या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर शुभा साठे लिखित समर्थक श्री रामदास स्वामी या पुस्तकामध्ये संभाजी महाराज यांचा उल्लेख दारुड्या असा करण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज हे दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडले होते, अशी ओळ या पुस्तकात छापण्यात आल्याने सर्व शिक्षा अभियानातील हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असून पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक आठरावर हा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खर्‍या-खोट्या अत्याचाराच्या बातम्या समर्थाच्या कानावर येत होत्या. तेव्हा संभाजी राजे दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडले होते. राज्याची अशी अवस्था पाहून समर्थाचे अंतकरण तुटत होते. त्यामुळे समर्थांनी अखेर संभाजी महाराजांना पत्र लिहिले, असे या पुस्तकात म्हटले आहे. दरम्यान, सर्व शिक्षा अभियानाच्या यादीत या पुस्तकाचा समावेश कसा काय करण्यात आला. या पुस्तकाची निवड कोणी केली आणि राज्यभर वाटप करण्याचा हेतू का ? याचा शोध सरकारने घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या पुस्तकामुळे आता राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *