नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल | अभिनेत्री तनुश्री दत्ता बुरखा घालून पोलीस ठाण्यात दाखल

मुंबई/ अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह चौघा विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी अभिनेत्री तनुश्री दत्ता ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल झाली. या वेळी कोणालाही ओळखू येऊ नये, म्हणून तिने बुरखा परिधान केला होता. या वेळी तिने जबाब दिल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासह हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील दोघा विरोधात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला. चौघावरही भा द वि 354 व 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी सायंकाळी अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या वकिलांसह ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली मीडियाला टाळण्यासाठी तिने बुरखा परिधान केला होता. त्यामुळे कुणालाही तिची ओळख पटली नाही. बॉलिवूडमध्ये सध्या मी टू मोहीम जोरदारपणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अभिनेत्री तनुश्री दत्ता नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. 2008 मध्ये आलेल्या हॉर्न ओके प्लीज या चित्रपटात तनुश्री दत्ता नाना पाटेकर यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान यांनी आपल्याला बाहूपाशात उडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिने केला आहे. दरम्यान, आरोपानंतर याबाबत नाना पाटेकर यांनीही खुलासा करून जे सत्य आहे ते सत्य आहे असे म्हटले आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील जाहीर करू, असे म्हटले होते. मात्र, पत्रकार परिषद घेताना मध्येच ते उठून गेले होते. आपण योग्य वेळी पुन्हा बोलू, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, तनुश्री च्या आरोपानंतर तिच्या पाठीमागे बॉलीवूड टाकले आहे. अनेकांनी तिचे समर्थन देखील केले आहे, तर नाना च्या पाठीमागे देखील अनेक जण उभे राहिले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *