बॉलीवूडचे संस्कारी बाबूजी ( आलोक नाथ) यांच्यावर बलात्काराचा आरोप – Me too# मोहिमेचा परिणाम

मुंबई/ बॉलिवूडमध्ये सध्या me too# मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती राजरोसपणे देत आहेत. नुकतेच नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुशी दत्ता हिने आरोप लावले आहेत. 2008 मध्ये त्यांनी आपल्यावर जबरदस्ती केली होती. याआधीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच 20 वर्षानंतर असे एक प्रकरण आता उघडकीस आले आहे. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या ‘तारा’ या मालिकेच्या दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी संस्कारी बाबूजी असलेल्या आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. केवळ me too# मोहिमेमुळे आपल्याला हे बळ मिळाल्याचे नंदा यांनी या वेळी सांगितले.
वीस वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर तारा ही मालिका प्रचंड गाजली होती. त्याचे दिग्दर्शन नंदा यांनी केले होते.
नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, वीस वर्षांपूर्वी माझ्यावरही असाच प्रसंग आला होता. त्यांनी आलोक नाथ यांचे नाव जरी घेतले नसले तरी आपल्या पोस्ट च्या शेवटी संस्कारी बाबूजी, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे लक्षात येते. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सविस्तर सांगितले आहे की, वीस वर्षांपूर्वी अलोक नाथ यांची पत्नी त्यांची जवळची मैत्रीण होती. अलोक नाथ यांची पत्नी माहेरी गेली असताना त्यांनी नंदा यांना एका पार्टीसाठी आमंत्रित केले. ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय सामान्य होती. त्यामुळे मी देखील त्यांच्या पार्टीमध्ये गेले. या वेळी मला  गुंगीचे औषध देण्यात आले. रात्रीचे दोन वाजले त्या वेळी सगळे मित्र आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर मला काही भान राहिले नव्हते. त्यामुळे अलोक यांनी घरी जाण्याची ऑफर दिली.
त्यानुसार त्यांनी मला आपल्या कारमधून घरी सोडले. सकाळी मला जेव्हा जाग आला तेव्हा मला बेडवरून सुद्धा उठता येत नव्हते. त्यांनी माझ्यावर अत्याचार केल्याचे मला जाणवले. तसेच त्यांनी अघोरी अत्याचार केल्याचे जाणवले. त्यानंतर झालेला हा प्रसंग मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितला. पण त्यांनी मला सर्व काही विसरून जाण्याचा सल्ला दिला. यामुळे तुझे नुकसान होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे मी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परत आले. मात्र, माझे इथे मन लागत नव्हते. त्यामुळे मी ड्रग्स आहारी गेले. त्यानंतर माझे करिअर बरबाद झाले. आता वीस वर्षानंतर me too# ही मोहीम आल्यामुळे मला देखील माझ्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती द्यावी वाटली. त्यामुळे मी ही पोस्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *