पुण्याजवळ 25 एकरांमध्ये पसरले आहे नाना पाटेकर यांचे आलीशान फॉर्महाउस, लग्जरी गाड्यांचे मालक असूनही जगतात साधारण आयुष्य

अभिनेत्री तनुश्री दत्ताने सेक्शुअल हरॅसमेंट आणि मारहाणीचा आरोप लावल्यामुळे नाना पाटेकर वादात अडकले आहेत. 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ मधून डेब्यू करणा-या नाना पाटेकर यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास 4 शतक झाले आहेत. या दरम्यान नानांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. वेबसाइट नेटवर्दियरच्यारिपोर्टनुसार, नाना जवळपास 10 मिलियन डॉलर (72 कोटी) प्रॉपर्टीचे मालक आहेत. यामध्ये त्याचा फॉर्महाउस, कार आणि दूस-या संपत्तीचाही समावेश आहे. एवढे असूनही नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात.

पुण्यात 12 कोटींचा शानदार फार्महाउस

नाना पाटेकरांजवळ पुण्याच्या जवळ खडकवासलामध्ये 25 एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाउस आहे. शहराच्या गर्दीपासून दूर नानांना जेव्हा रिलॅक्स करायचे असते, तेव्हा ते तेथे जातात. डायरेक्टर संगीत सिवान यांच्या 2008 मध्ये आलेल्या ‘एक : द पावर ऑफ वन’ची शूटिंगही नानाच्या याच फॉर्महाउसमधून झाली होती. नानांनी आपल्या या फार्महाउसजवळ धान्य, गहू आणि हरब-याची शेतीही करतात. नाना पाटेकरांच्या या फार्महाउसमध्ये 7 खोल्यासोबतच एक मोठा हॉल आहे. यामध्ये नानांच्या आवडीनुसार, सिंपल वुडन फर्नीचर आणि टेराकोटा फ्लोर आहे. नानांनी आपले घर आपल्या गरजेनुसार सजवले आहेत. यासोबतच घराजवळ अनेक प्रकारचे झाडं-झुडपंही लावण्यात आली आहेत. फार्महाउसमध्ये मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.

नाना पाटेकरांजवल 81 लाखांची ऑडी Q7 कार

टाइम्स नाऊ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, नाना पाटेकरांजवळ 81 लाख रुपयांची ऑडी Q7 कार आहे. यासोबतच त्यांच्याजवळ एक 10 लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि 1.5 लाख किंमतीची रॉयल इनफील्ड क्लासिक 350 आहे.

75 कोटींचे मालक आहेत नाना

– नाना पाटेकर मराठा असून 1978 पासून ते फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 360 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे

– काही कारणास्तव त्यांचे 36 सिनेमे आजवर रिलीज झालेले नाहीत.

– नानांकडे एकुण 75 कोटींची मालमत्ता आहे.

– काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत नानांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी उघड केल्या होत्या.

– नाना म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसारच खर्च करायला हवा. म्हणून ते लग्झरी आयुष्य जगत नाहीत.

– नाना त्यांच्या आईंसोबत 720 चौ. फुटाच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत.

– 90च्या दशकात त्यांनी हा फ्लॅट केवळ 1.1 लाखात खरेदी केला होता.

– आरामदायी जीवन जगण्यापेक्षा नाना पाटेकर 1 BHK घरांत त्यांच्या आईसोबत सुखात आणि आनंदात राहत आहेत.

पुढील स्लाईडवर वाचा, भारतीय सेनेत घेतले प्रशिक्षण…

आर्मीचे घेतले ट्रेनिंग

– ‘प्रहार’ चित्रपटाच्या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांनी तीन वर्षे आर्मीचे ट्रेनिंग घेतले होते.
– 1991 मध्ये आलेल्या प्रहार या सिनेमात नानांनी आर्मी ऑफिसरची भूमिका वठवली होती. भूमिकेत जीवंतपणा आणण्यासाठी त्यांनी आर्मीचे ट्रेनिंग घेतले होते.
– 1990 मध्ये भारतीय सेनेने त्यांना टेरिटोरिअल आर्मीमध्ये ऑर्नरी कॅप्टन रँकने सन्मानित केले होते.
– देशाचे खरे हीरो सैनिकच असल्याचे नाना म्हणतात.
पुढील स्लाईडवर वाचा, सिनेमात येण्यापूर्वी काय करायचे नाना आणि आता कशाची आहे आवड..

स्केच आर्टिस्ट आहेत नाना

– नाना पाटेकर सिनेसृष्टीत आवड म्हणून नव्हे तर परिस्थितीमुळे आले होते. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात.
– सिनेमात येण्यापूर्वी रस्त्यावर ते झेब्रा क्रॉसिंग पेंटिंगचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.

– नाना एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ते आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करायचे.

शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे आलेत नाना

– मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी ‘नाम’ संस्था स्थापन केली. यामार्फत नानांनी प्रत्येकी शेतक-यांच्या कुटुंबाला 15 हजार रुपयांची मदत केली आणि असे एकूण 62 शेतक-यांची कुटुंबे होती.
– नुसते पैसे न देता नानांनी स्वत: मराठवाड्यातील जवळपास 112 शेतक-यांच्या घरी भेट दिली.
– नाना पाटेकरांनी त्यांच्या एकूण कमाईतील 90% कमाई समाजसेवेत दान केली.
– कोणत्याही गोष्टींकडे, परिस्थितीकडे नानांचा सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन असतो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *