तुम्हाला माहित आहे का ? देवाला दुर्वा का वाहतात ते !

सध्या जगभरात गणरायाच्या आगमनाची आतुरतेने भाविक वाट पाहत आहेत. तसेच दोन दिवसानंतर गौरीच्या आगमनाची चाहूल लागणार आहे. यासाठी पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात लागते. तसेच पानपत्ते फुले पण लागतात. पण यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्वा असतात. दूर्वा या प्रत्येक देवाला अतिशय प्रिय प्रिय असतात. अतिशय औषधी गुणधर्म असलेल्या दूर्वा देवाला नेमक्या का वाहतात याबद्दल आपण जाणून घेऊयात.
दुर्वा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

दूर्वाचे शास्त्रीय नाव कॅनडन इंटॅक्टलाईन असे आहे. दुर्वा या पोटदुखीवर अतिशय उपयोगी असतात. हे एक परिचित उपयुक्त आणि अनेक वर्षांपासून बहुतेक उष्ण देशात सर्वत्र आढळते. देवाला वाहण्यासाठी दुर्वांचा वापर होतो. हिमालयात तर 24 मीटर उंचीपर्यंत व अनुकूल परिस्थितीत आणि शेतात मोठ्या प्रमाणात दुर्वा वाढतात काहीजण याला तणकट देखील म्हणतात. संस्कृत भाषेत दूर्वांला जवळपास चाळीस नावे आहेत.

वैद्यकशास्त्रामध्ये शांड ध्रुवा व पाकदूर्वा असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. बहुदूर्वा हे नाव शांडदुर्वेला वापरलेले आहे. श्री गणेशास दूर्वा अतिशय प्रिय आहेत. त्या मुळासहीत वाहत नाहीत. दूर्वा बहुदा विषम संख्येने किमान 3, 7,5 21 वगैरे अशा वाहतात. गणेशोत्सवामध्ये दुर्वांची मागणी अधिक वाढते. गणपतीला विशेष करून 21 दुर्वा वाहतात. दूर्वा एकत्र बांधतात व एकत्रित बांधल्याने त्यांचा सुगंध बराच वेळ टिकून राहतो. त्या पाण्यामध्ये भिजवून दूर्वा देवा लावाव्यात. दूर्वा या अमर आहेत. देवांना जेव्हा सागर मंथनातून अमृत प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी अमृतकुंभ दुर्वांच्या आसनावर ठेवला. त्यातील काही थेंब दुर्वांकुरवर पडले आणि दूर्वा अमर झाल्या, असे शास्त्रात सांगितले आहे. जमिनीवर किंवा थोडे पृष्ठभागाखाली दुर्वा वाढून खूप लवकर पसरते. लहान खांद्यावर हिरवीगार रेषाकृती बारीक गवतासारखे पाणी येतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *